विद्युत पोल, वीजवाहिन्या बुडाल्या सिंचन प्रकल्पात!
By Admin | Updated: September 14, 2016 02:25 IST2016-09-13T02:51:03+5:302016-09-14T02:25:18+5:30
सोयता येथील प्रकार : शेतक-यांचा जीव सापडला धोक्यात!

विद्युत पोल, वीजवाहिन्या बुडाल्या सिंचन प्रकल्पात!
वाशिम, दि. १२ : राज्यभरातील ग्रामीण भागात महावितरणच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अक्षरश: जेरीस आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील सोयता येथे तर महावितरणने चक्क सिंचन प्रकल्पातच विद्युत पोल उभे केले असून, अस्ताव्यस्त स्वरूपात पडून असलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे शेतकर्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. सोयता येथे लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने सन २00६ ते २0१0 च्या दरम्यान कोट्यवधी रुपये खचरून सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. यामुळे शेतकर्यांना जाणवणारी सिंचनाची समस्या बहुतांशी निकाली निघाली; मात्र महावितरणने चक्क धरणातच विद्युत पोल उभे केले. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून धरणातील पाण्यालगत तथा धरणाबाहेरच्या जमिनीलगत विद्युत वाहिन्या झुकल्याने परिसरातील शेतकर्यांचा जीव धोक्यात सापडला आहे. यासंदर्भात महावितरणला अनेक वेळा अवगत केले; मात्र त्याचा कुठलाच फायदा झाला नाही, असे सोयता येथील बाधित शेतकर्यांचे म्हणणे आहे.