विजेच्या धक्क्याने बैल ठार
By Admin | Updated: April 15, 2015 01:08 IST2015-04-15T01:08:15+5:302015-04-15T01:08:15+5:30
खांबावर विजेची जिवंत तार पडल्याने जमिनीतही विजप्रवाह; सुदैवाने गाडीत बसलेले तिघ बचावले.

विजेच्या धक्क्याने बैल ठार
कारंजा लाड (जि. वाशिम): वाई या गावात विजेच्या खांबाला करन्ट आल्याने बैलगाडी ओढणारा एक बैल जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली. मंगळवारी सकाळी वाई परिसरात पाऊस सुरु असतांना बबनराव चव्हाण बैलगाडीने शेताकडे जात होते. विजेच्या खांबाजवळ बैलगाडी आली. खांबावर विजेची जिवंत तार पडल्याने खांबात व पर्यायाने जमिनीतही विजप्रवाह आला. त्यामुळे बैल जागीच ठार झाला. सुदैवाने गाडीत बसलेले तिघे व एक बैल वाचला. अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त झाला असताना विजेचा धक्का लागून बैल दगावल्याने शेतकर्याचे अंदाजे ४0 हजार रुपयाचे नुकसान झाले. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने याची भरपाई द्यावी अशी मागणी गावकरी करत आहेत. अनेक तारा तुटलेल्या आहेत. खांबही वाकले आहे. केव्हाही जिवीत व वित्त हानी होवू शकते त्यामुळे याकडे कंपनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.