विद्युतझटक्यात युवक ठार

By Admin | Updated: September 10, 2014 00:41 IST2014-09-10T00:41:22+5:302014-09-10T00:41:22+5:30

उघड्या विजेच्या तारावर पाय पडल्याने ३0 वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू.

Electricians killed in youth | विद्युतझटक्यात युवक ठार

विद्युतझटक्यात युवक ठार

वाशिम : उघड्या विजेच्या तारावर पाय पडल्याने ३0 वर्षीय युवकाचा विजेचा धक्का लागून त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाशिम तालुक्यातील सुराळा येथे ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३0 वाजताचे सुमारास घडली. सुराळा येथील शेख हसन शेख बशीर हा युवक सकाळी ७ वाजता जनावराला चारा आणण्याकरीता शेतामध्ये गेला होता. गेल्या दोन दिवसापासुन पाऊस व वारा वाहत असल्याने त्या शेतामधून गेलेल्या विद्युत वाहिनीचा एक तार तुटून धुर्‍यावर पडलेली होती. शेख बशीर याचा पाय धुर्‍यावर पडलेल्या विद्युत तारेमध्ये अडकला. तारेमध्ये विज वाहत असल्याने त्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. घटनेचा तपास जमादार वसंत तहकिक करीत आहेत.

Web Title: Electricians killed in youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.