विद्युत तारा लोंबकळल्या !
By Admin | Updated: July 26, 2014 22:24 IST2014-07-26T22:24:51+5:302014-07-26T22:24:51+5:30
ग्रामस्थांच्या जीवित्वास धोका : संबंधितांचे दुर्लक्ष

विद्युत तारा लोंबकळल्या !
झोडगा बु. : गावात विद्युत पुरवठा करणार्या विद्युत खांबावरील तारा लोंबकाळल्याने अपघात व ग्रामस्थ्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसूनयेत आहे. झोडगा बु. येथील स्ट्रीटलाईट पोलवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारा लोंबकळत असतांना दिसत आहेत. सद्या पावसाळयाचे दिवस असल्याने कधीही जोरदार पाऊस व वारा येवून लोंबकळलेल्या तारा जमिनवर पडू शकतात. लहान मुले व नागरिक या रस्त्यावरून नेहमी येर्जा करतात यामुळे या गंभीर बाबींची दखल घेवून महावितरण कंपनीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.