विद्युत खांबाला लाकडाचा आधार!

By Admin | Updated: June 14, 2017 20:34 IST2017-06-14T20:05:14+5:302017-06-14T20:34:23+5:30

शिरपूर (वाशिम) - वीज वितरण कंपनीच्यावतिने मान्सून पूर्व कामे करण्यात आली नसल्याने अर्धा-अधिक कोसळलेल्या विद्युत खांबाला लाकडाचा आधार देण्यात आला आहे

Electric Pole Wood Support! | विद्युत खांबाला लाकडाचा आधार!

विद्युत खांबाला लाकडाचा आधार!

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर (वाशिम) - वीज वितरण कंपनीच्यावतिने मान्सून पूर्व कामे करण्यात आली नसल्याने अर्धा-अधिक कोसळलेल्या विद्युत खांबाला लाकडाचा आधार देण्यात आला आहे. सदर प्रकार शिरपूर जैन रस्त्यावर दिसून येत आहे. विशेष म्हणजे येथून दररोज शेकडो वाहने भरधाव वेगाने धावतात एखादयावेळी अपघाताची दाट शक्यता दिसून येत आहे. पावसाळयाआधी वीज वितरण कंपनीच्यावतिने खांबावरील तारा लोंबकळलेल्या आहे का, खांब सुस्थितित आहेत की नाही याची पाहणी आवश्यक आहे परंतु याकडे संबधितांचे दुर्लक्ष असल्याने शिरपूर जैन रस्त्यावर विद्युत खांबाला लाकडाचा आधार देवून उभे करण्यात आले आहे.

Web Title: Electric Pole Wood Support!