निवडणूक, महसूलच्या अधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:50+5:302021-02-13T04:39:50+5:30
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जगातील सर्वांत ...

निवडणूक, महसूलच्या अधिकाऱ्यांनी घेतली कोरोना लस
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून देशात सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर आता ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ म्हणून काम करणारे महसूल, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लस देण्यात येत आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नावनोंदणीची कार्यवाही करून त्यांना लसीकरणासाठी मोबाइलवर संदेश पाठविले जात आहेत.
....................
बॉक्स :
कोणताही दुष्परिणाम जाणवला नाही - हिंगे
कोरोनाची लस घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे म्हणाले, कोरोनाची लस घेण्याबाबतचा संदेश प्राप्त झाल्यानंतर मी जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली. त्याचा कुठलाही दुष्परिणाम जाणवला नाही. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लस उपयुक्त ठरणार आहे, असे ते म्हणाले.