निवडणूक प्रचार साहित्य महागले

By Admin | Updated: September 12, 2014 23:05 IST2014-09-12T23:05:10+5:302014-09-12T23:05:10+5:30

उमेदवारांचा खर्चही वाढला असल्याने निवडणुक साहीत्याच्या मागणीवर परिणाम.

Election promotional literature was expensive | निवडणूक प्रचार साहित्य महागले

निवडणूक प्रचार साहित्य महागले

वाशिम :विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा हळूहळू उडू लागला आहे. या प्रचारात नेत्यांच्या सभांबरोबरच प्रचारसाहित्याचा सहभाग महत्त्वाचा असतो. महागाई आकाशाला भिडली असताना याचे चटके निवडणूकीतील प्रचार साहित्याला पण बसले असून यावेळी प्रचार साहित्यांच्या दरात साधारणपणे ३५ ते ४0 टक्के दरवाढ झाली आहे. सध्या विधानसभा निवडणूकीचा ज्वर चढला आहे. १५ ऑक्टोंबरला मतदान होणार आहे. तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. . त्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या इच्छूकांनी मतदारसंघातील बड्या नेत्यांच्या भेटीगाडी सुरू केल्या आहेत. विदर्भात नागपूर, अमरावती येथून झेंडे, स्कार्फ, ध्वज तयार करून मिळतात तर पोस्टर, पॉम्पलेट, बॅनर ही कामे तालुकास्तरावर सहजपणे करून मिळतात. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सभा, प्रचारफेरी यांचा धडाका सुरू होणार आहे. उमेदवारांच्या प्रचाराला नेत्यांच्या भाषणाबरोबरच पक्षांचे फडकणारे झेंडे सभेत प्रचारात जान आणतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात झेंड्यांचा वापर निवडणुकीत होतो. त्याचबरोबर बिल्ले, उपरणे, छापील पोस्टर याला पण चांगली मागणी असते. प्रत्येक पक्षाचा झेंडा ठरलेला आहे. महागाईमुळे सध्या विविध वस्तूंची दरवाढ होत आहे. त्यामुळे झेंडे तयार करण्यात येणारा खर्चही वाढला आहे. पूर्वी एका झेंड्याला तीन ते चार रुपये खर्च होता. आता तो पाच ते सहा रुपये एवढा खर्च झाला आहे.

Web Title: Election promotional literature was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.