महसूल कर्मचारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST2021-08-25T04:45:46+5:302021-08-25T04:45:46+5:30

जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र राऊत (अव्वल कारकून), उपाध्यक्षपदी निलेश सोळंके (महसूल सहाय्यक), ...

Election of a new executive of the Revenue Employees Union | महसूल कर्मचारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

महसूल कर्मचारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड

जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी रवींद्र राऊत (अव्वल कारकून), उपाध्यक्षपदी निलेश सोळंके (महसूल सहाय्यक), नरेंद्र सोनोने (अव्वल कारकून), देवेंद्र कांबळे (शिपाई), सचिवपदी मयूर इप्पर (अव्वल कारकून), सहसचिव पदी संदीप आडे (अव्वल कारकून), गजानन देशमुख (महसूल सहाय्यक), संघटकपदी संदीप काळबांडे (महसूल सहाय्यक), सदस्य म्हणून श्रीकांत वडोदे (महसूल सहाय्यक), महिला सदस्या म्हणून रंजना अडकिने (अव्वल कारकून), रुपल खांदवे (अव्वल कारकून) यांचा समावेश करण्यात आला. सभेला वाशिम जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी उपस्थित होते. सभा आयोजनास विशाल डुकरे माजी अध्यक्ष, सचिन मोरे, माजी सचिव अरविंद करांगळे, अतुल कराळे, अशोक डोंगरे, महादेव चिमणकर, महादेव बिराजदार, प्रमोद वानखडे व सर्व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Election of a new executive of the Revenue Employees Union