निवडणूक मानधनाची अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:48+5:302021-03-21T04:40:48+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ...

निवडणूक मानधनाची अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच
ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २५५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २९ जण कोरोना बाधित आढळले, तर ५३९ मतदान केंद्रासाठी अधिकारी, कर्मचारी मिळून २२०६ जणांची नियुक्ती करण्यात आली. ही मतदान प्रक्रिया १८ जानेवारीला पार पडली. शासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीच्या खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. जिल्ह्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींसाठी सुरुवातीला प्रती ग्रामपंचायत १५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आणि तो तहसीलस्तरावर वर्गही करण्यात आला; परंतु निवडणुकीच्या खर्चात प्राधान्य क्रमानुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा क्रम शेवटचा येतो. त्यामुळे अद्यापही निवडणुकीचे मानधन अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळू शकले नाही.
१) पॉईंटर्स
जिल्ह्यात निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती - १५२
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले अधिकारी - ५३९
निवडणुकीत कर्तव्य बजावलेले कर्मचारी - १६६७
२) तालुकानिहाय आढावा
तालुका ग्रामपंचायती अधिकारी-कर्मचारी
वाशिम १९
रिसोड ३२
मालेगाव २८
मंगरुळपीर २५
मानोरा २१
कारंजा १७
------------------------------
३) शासनाकडून मिळाले प्रती ग्रामपंचायत १५ हजार
निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजारांचा निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त होतो. त्यापैकी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत १५ हजार रुपयांचाच निधी जिल्हा निवडणूक विभागास प्राप्त झाला. हा निधी तहसीलस्तरावर वर्गही करण्यात आला; परंतु या निधीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मानधनाऐवजी इतर प्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाची अदायगी करण्यास प्राघान्य देण्यात आले. त्यानंतर अद्यापही शासनस्तरावरून निवडणूक खर्चापोटी निधी प्राप्त झालेला नाही.
----------------
४) एकाही तालुक्यात मानधनाचे पूर्ण वितरण नाही
जिल्ह्यात पार पडलेल्या १५२ ग्रामपंचायतींच्या निवडणूक खर्चापोटी प्रती ग्रामपंचायत २५ हजार निधीतून प्रत्येकी १५ हजारांचा निधी शासनस्तरावरून प्राप्त झाला असला तरी, त्यातून इतर खर्चाचीच अदायगी करण्यास प्राधान्य देण्यात आल्याने जिल्ह्यातील सहाही तालुक्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मतदान प्रक्रियेची जबाबदारी पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मानधनाचे पूर्ण वितरण अद्यापही होऊ शकले नाही. त्यामुळे निवडणुकीत केवळ मानधन केव्हा, अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून व्यक्त होत आहेत.