अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

By Admin | Updated: May 13, 2017 13:55 IST2017-05-13T13:55:18+5:302017-05-13T13:55:18+5:30

तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली.

Eighth Village Village Water Supply Scheme | अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

अठ्ठाविस गाव पाणी पुरवठा योजना पुर्ववत

नागरिकांनी सोडला सुटकेचा श्वास : लोकमतचा प्रभाव
मानोरा : तालुक्यातील पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याचे कारण पुढे करुन तब्बल पंधरा दिवसापासून बंद असलेली अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना पुर्ववत करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना तुर्तास दिलासा मिळाला आहे.पाणी पुरवठा पुर्ववत करण्यासाठी लोकमतने १० मे व १३ मे रोजी वृत्त प्रकाशित करुन पाठपुरावा केला होता.

तालुक्यासाठी एकमेव अतिशय महत्वाची योजना असलेल्या अठ्ठाविस गावे पाणी पुरवठा योजना वरदान ठरली आहे. पंरतु गेल्या पंधरा दिवसापासून पंचाळा फाटा येथे पाईप फुटल्याने ही योजना बंद पडली होती. त्यामुळे योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.शिवाय दुषीत पाण्याचा सामना करावा लागत होता. मे महिन्यात सुर्य आग ओकु लागल्याने पाण्यासाठी नागरिकांचा जिव कासाविस झाला होता. त्यासाठी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. वृत्ताची दखल घेत माजीप्राने दखल घेत तातडीने ही योजना पुर्ववत करण्यात आली.त्यामुळे नागरिकांना सुटकेचा श्वास घेतला.

Web Title: Eighth Village Village Water Supply Scheme