ईदनिमित्त फुलला बाजार
By Admin | Updated: July 28, 2014 01:51 IST2014-07-28T01:47:27+5:302014-07-28T01:51:26+5:30
खरेदीसाठी गर्दी : मुस्लीम समाज बांधवात उत्साह, कारंजालाड येथील बाजारपेठ सजली.

ईदनिमित्त फुलला बाजार
कारंजालाड :मुस्लिम बांधवाची ह्यरमजान ईदह्ण मंगळवार २९ जुलै रोजी साजरी होत असून, त्यानिमित्त येथील बाजारपेठ गर्दीने फुलली आहे.
ह्यरमजान ईदह्ण च्यानिमित्त गवळीपुरा येथील मस्जिद, नगिना मस्जिद, जामा मस्जिद, अस्तानामधील मस्जिद व इतर मस्जिदमध्ये आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच कपडे, टोपी, सुका मेवा, चप्पल, बूट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सुकामेवा, रंगीबेरंगी शेवया यासह इतर वस्तू घेण्याकडे मुस्लिम भाविक बाजारपेठेत गर्दी करीत आहे. येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, शिवाजी महाराज पुतळा चौक, शास्त्री चौक, इंदिरा गांधी चौक, महात्मा फुले चौक या मार्गावर सर्व प्रकारच्या वस्तूंची दुकाने आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मुस्लिम भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. महागाईने मात्र काही प्रमाणात मुस्लीम बांधवाना निराश केले आहे. सुक्या मेव्यापासून सर्वच वस्तुंचे दर वाढलेले दिसून येत आहेत