वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 03:04 PM2019-08-12T15:04:47+5:302019-08-12T15:04:51+5:30

वाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली

'Eid-ul-Azha' with enthusiasm in Washim district | वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात  

वाशिम जिल्ह्यात ‘ईद-उल-अजहा’ उत्साहात  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात सोमवार १२ आॅगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेली ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मुस्लिम बांधवांनी ईदगाहवर नमाज अदा करून अल्लाहकडे विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. 
मंगरुळपीर, रिसोड, कारंजा, मालेगाव, वाशिम आणि मानोरा तालुक्यात ‘ईद-उल-अजहा’ सणानिमित्त मुस्लिम बांधवांना सर्वधर्मियांकडून शुभेच्छाही देण्यात आल्या. मुस्लिम बांधव ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा करण्यासाठी आपापले शहर आणि गावातील ईदगाहवर गोळा झाले. या ठिकाणी शांततेत नमा अदा करण्यात आल्यानंतर ‘खुतबा-ए-ईद’ अदा करून विश्वशांतीसाठी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. दरम्यान, मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव येथे १२ आॅगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता मुस्लिम हिजरी वर्षातील जिलहज महिन्यातील उर्दू १० तारखेला ईदगाहवर  नमाज-ए ईद-उल-अजाह अदा करून उत्साहात बकरी-ईद साजरी करण्यात आली. नमाज-ए ईद-उल-अजाह अदा करण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधाव स्थानिक जामा मशिदीसमोर एकत्र आले. त्यानंतर येथून रॅलीच्या रुपाने हे सर्व बांधव ईदगाह मैदानावर पोहोचले. तेथे इमाम मोहम्मद शाहिद रजा यांनी सर्वांना ईदची नमाज अदा करण्याबाबत मार्गदर्शन केले आणि मौज्जन सलीम खान यांनी अजान दिल्यानंतर ईदची नमाज अदा करण्यात आली. नमाज अदा केल्यानंतर खुतबा-ए-ईद अदा करून सर्वांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, ठाणेदार एस. एस. शिपने यांच्या मार्गदर्शनात ईदनिमित्त चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदची नमाज झाल्यानंतर ईदगाहवरून परतलेल्या मुस्लिम बांधवांनी ठाणेदार संजय शिपने आणि पोलीस कर्मचाºयांनी पोलीस-नागरिक मित्रता कायम ठेवताना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

Web Title: 'Eid-ul-Azha' with enthusiasm in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम