शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

डिजिटल सातबारात वाशिम जिल्ह्याची प्रभावी कामगिरी ; ४७ टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:28 PM

वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली  असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.

ठळक मुद्दे आॅनलाईन सात-बारा उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी आॅनलाईन सात-बारा सक्तीचा करण्यात आला आहे. या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विभागात शेवटच्या स्थानावर असलेल्या वाशिम जिल्हा प्रशासनाने कामगिरीत सुधारणा करून ४७ टक्के काम पूर्ण केले आहे.

वाशिम: डिजिटल सातबारा प्रक्रियेत सुरुवातीला माघारलेल्या जिल्ह्याने कामगिरीत सुधारणा के ली  असून, जिल्ह्यातील ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांपैकी ४७ टक्के सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन हे सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोडिंगसाठी तयार झाले आहेत.राज्य शासनाच्यावतीने सध्या राज्यात जिथे तिथे आॅनलाईन सात-बारा उतारा मागितला जात असला तरी शेतकºयांसाठी आॅनलाईन सातबारा उतारा मिळवणे ही मोठी जिकीरीची बाब आहे. अनेक ठिकाणी इंटरनेट स्पीड, वीज अशा सुविधांचा अभाव आहे. त्यातही आॅनलाईन सात-बारा उताºयाची प्रिंट मिळाली तरी तो आहे तसा बँक किंवा कोर्टाच्या कामकाजात आहे तसा वापरता येत नाही. त्यावर पुन्हा तलाठ्याचा सहीशिक्का आवश्यक असतो. त्यासाठी पुन्हा तलाठ्यांकडे जावे लागते. एकूणच आॅनलाईन सात-बारा उतारा हा सोईपेक्षा अडचण जास्त असला तरी अनेक ठिकाणी आॅनलाईन सात-बारा सक्तीचा करण्यात आला आहे. शेतकºयांच्या या अडचणीवर उपाय म्हणून आता तलाठ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेला सात-बारा उतारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा दस्तऐवज महाभूलेख संकेतस्थळावर उपलब्धही करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात ८०९ गावांतील २ लाख ४९ हजार सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी करण्यात येत असून, सुरुवातीला अमरावती विभागात शेवटच्या स्थानावर असलेल्या वाशिम जिल्हा प्रशासनाने कामगिरीत सुधारणा करून ४७ टक्के काम पूर्ण केले आहे. दरम्यान, काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात खोळंबा निर्माण होऊन तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी झालेले सातबारा महाभूलेख संकेतस्थळावर अपलोड करणे कठीण झाले आहे. तथापि, तलाठ्यांचे काम मात्र सुरूच आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय