शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

अद्रक खा; पण कापून अन् जपूनच! कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:39 IST

वाशिम : स्वयंपाकातील भाज्यांमध्ये आणि दिवसभरातील चहामध्ये सर्रास वापरल्या जाणारी अद्रक कुठलीही सुरक्षितता न बाळगता चांगली ठेचून घेतली जाते. मात्र, हा प्रकार एखादवेळी आरोग्यास बाधा पोहचविणारा ठरू शकतो. कारण अद्रकमध्येही कंद खाणा-या अळ्या आढळत असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अद्रक कापून नंतरच ठेचलेली बरी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गिते यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.

ठळक मुद्देकंद खाणा-या अळीचा प्रादुर्भाव आरोग्यास पोहचू शकते बाधा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वयंपाकातील भाज्यांमध्ये आणि दिवसभरातील चहामध्ये सर्रास वापरल्या जाणारी अद्रक कुठलीही सुरक्षितता न बाळगता चांगली ठेचून घेतली जाते. मात्र, हा प्रकार एखादवेळी आरोग्यास बाधा पोहचविणारा ठरू शकतो. कारण अद्रकमध्येही कंद खाणा-या अळ्या आढळत असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अद्रक कापून नंतरच ठेचलेली बरी, असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गिते यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.यासंदर्भात डॉ. गिते यांनी सांगितले, की शेतात लागवड करण्यात आलेल्या अद्रकवर कंद पोखरणाºया अथवा कंद खाणा-या अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अद्रक काढून ती बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यानंतरही ही अळी त्यात अनवधानाने राहू शकते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून अद्रक बिनधास्तपणे ठेचून वापरण्यापूर्वी ती कापून घेणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरते, असा सल्ला डॉ. गिते यांनी दिला.

हॉटेल व्यावसायिकांनीही सुरक्षितता बाळगणे गरजेचेघर चालविणाºया महिलांसोबतच भोजनालये, जेवणाच्या हॉटेल्समध्येही साधारणत: अद्रक थेट ठेचून घेण्याची जणू प्रथाच पडलेली आहे. मात्र, कंद खाणाºया अळ्याही त्यासोबत ठेचल्या जाऊ शकत असल्याने आरोग्यास कधीकाळी बाधा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे अद्रकचा वापर करण्यापूर्वी ती प्रथम कापून, पडताळून घेतल्यानंतरच वापर करणे फायद्याचे ठरू शकते.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती