अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:42 AM2018-02-17T00:42:33+5:302018-02-17T00:43:22+5:30

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Akola: Dr. PDKV Research : seven varieties of oil seeds developed! | अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

अकोला : डॉ. पंदेकृविचे संशोधन : तेलबियांचे सात वाण विकसित!

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारे तेलबियांचे सात वाण विकसित केले आहेत; पण पूरक दर मिळत नसल्याने या क्षेत्रात अद्याप वाढ झाली नाही. दरम्यान,मागच्या वर्षी केंद्र शासनाने रिफाइंड खाद्यतेलावर दुप्पट आयात कर लावल्याने तेलबियांच्या दरात वाढ होऊन तेलबिया क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन विभागाने डॉ. एस.एन. देशमुख यांच्या नेतृत्वात टीएजी-२४, एके-१५९,  एके-२६५ व एके- ३0३ भुईमुगाचे वाण विकसित करण्यात आले आहे. सर्व वाण खरीप हंगामात भरघोस उत्पादन देणारी आहेत. एके- २६५ वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आले आहे. एके-३0३ भुईमुगाचे वाणही खरीप हंगामासाठी आहे. या भुईमुगाचा एक दाणा एक ग्रामचा आहे, हे विशेष. या वाणाची शेतकर्‍यांकडून मोठी मागणी आहे. 
 करडीमध्ये पीकेव्ही- पिंक व एकेएल-२0७ हे दोन वाण अलीकडेच विकसित करण्यात आले आहे. करडी पिंक या वाणाचे फूल गुलाबी आहे. हे वाण प्रसारित करण्यात आले. या वाणापासून इतर वाणापेक्षा दोन टक्के अधिक म्हणजे ३३ टक्के तेल मिळते. सूर्यफूल-एसएस हे संकरित वाणही विकसित करण्यात आले आहे. नरनपुंसकतेवर आधारित तेलबिया संकरित वाण निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न सुरू  आहेत. तेलबियांचे संशोधन करू नही क्षेत्र सातत्याने घसरत आहे.
  विदर्भात सूर्यफुलाचे क्षेत्र १ लाख २५ हजार हेक्टर होते. ते घसरू न आठ हजार हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र ८0 हजार हेक्टर होते, तेदेखील १५ हेक्टर खाली आले आहे. खरिपाचा भुईमूग दोन लाख हेक्टरहून झपाट्याने खाली घसरत सहा हजार हेक्टरवर आला आहे. उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर आहे. 

भुईमूग संशोधन प्रकल्पाचा प्रस्ताव
भुईमुगावर संशोधन करण्यासाठी अखिल भारतीय संशोधन (एआयसीआरपी) प्रकल्पाचा प्रस्ताव भारतीय संशोधन परिषदेकडे कृषी विद्यापीठाने पाठविला आहे. हे केंद्र मिळाल्यास भुईमुगावर आणखी संशोधन करता येईल.

कृषी विद्यापीठाने दज्रेदार भरघोस उत्पादन देणारे तेल बियाणे वाण विकसित केले असून, शेतकर्‍यांची मागणी वाढली आहे. यावर्षी रब्बी हंगामात करडई क्षेत्र वाढले आहे. उन्हाळी भुईमुगाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे.
डॉ. विलास खर्चे,
संशोधन संचालक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

Web Title: Akola: Dr. PDKV Research : seven varieties of oil seeds developed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.