शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ९५ शाळांचे ‘ई-लर्निंग’ बंद; विद्यार्थ्यांना फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 14:15 IST

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७८ शाळा असून, यापैकी ५७० पेक्षा अधिक शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम राबविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वीज देयकाचा भरणा करण्यासाठी निधीची स्वतंत्र तरतूद नसल्याने जवळपास ९५ शाळांचा वीजपुरवठा खंडीत आहे. त्यामुळे या शाळांमधील ‘ई-लर्निंग’ही बंद पडले आहे.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा डिजीटल करण्यासाठी लोकसहभागावर भर दिला जातो तसेच समग्र शिक्षा अभियानातूनही काही प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. पाठिवरचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना एका क्लीकवर सर्व अभ्यासक्रमाची माहिती मिळावी यासाठी शासनाने डिजीटल शाळा करण्याचा उपक्रम हाती घेतला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ७७८ शाळा असून, यापैकी ५७० पेक्षा अधिक शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रम राबविला जात आहे. लोकसहभाग आणि शासनाच्या निधीतून हा ई-लर्निंग उपक्रम यशस्वी साकारण्यात आला आहे. मात्र, वीज देयकाचा भरणा कसा करावा? हा प्रश्न अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. ग्राम पंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून भरघोस निधी मिळतो. या निधीमधून ग्राम पंचायतींनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विज देयकाचा भरणा करण्यासाठी तरतूद करावी, अशी मागणी मुख्याध्यापक व शिक्षकांनी अनेकवेळा केली आहे. परंतू, अद्याप या मागणीची दखल ग्राम पंचायत प्रशासनाने घेतली नाही.जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये वीज देयकाचा भरणा न केल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. त्यामुळे या शाळांमधील ‘ई-लर्निंग’ही बंद आहे. 

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षणSchoolशाळा