द्वारपोच धान्य योजनेला वाशिम व कारंजात ठेंगा!

By Admin | Updated: June 6, 2016 02:02 IST2016-06-06T02:02:36+5:302016-06-06T02:02:36+5:30

वाशिम व कारंजा तालुक्यात अद्याप सुरू झाली नाही.

Dwarpole grain scheme will be in Washim and fountain! | द्वारपोच धान्य योजनेला वाशिम व कारंजात ठेंगा!

द्वारपोच धान्य योजनेला वाशिम व कारंजात ठेंगा!

वाशिम : रेशनच्या धान्य घोटाळ्याला पायबंद घालण्याच्या उद्देशातून अंमलात आलेली द्वारपोच धान्य योजना वाशिम व कारंजा तालुक्यात अद्याप सुरू झाली नाही. उर्वरित चारही तालुक्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू असल्याने नेमके वाशिम व कारंजात अंमलबजावणी का नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गोरगरीब लाभार्थींंंना स्वस्तात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्न पुरवठा विभागातर्फे रेशन धान्याची व्यवस्था केली जाते. रेशन धान्य वितरणात काही ठिकाणी ह्यघोटाळेह्ण उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर शासनाने कठोर पावले उचलली आहेत. शिधापत्रिकाधारकांना त्यानुसार द्वारपोच धान्य देण्याचा उपक्रम शासनाने सुरू केला आहे. शासकीय गोदामातून धान्य दुकानदाराच्या हाती न देता, थेट गावात धान्य पोचविणे या योजनेनुसार अपेक्षित आहे. या योजनेची अंमलबजावणी १ जूनपासून सुरू झाली. वाशिम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर व मानोरा तालुक्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र वाशिम व कारंजा तालुक्यात सदर योजना सुरू न झाल्याने कुठे तरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Dwarpole grain scheme will be in Washim and fountain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.