पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल
By Admin | Updated: April 30, 2015 01:47 IST2015-04-30T01:47:45+5:302015-04-30T01:47:45+5:30
पाण्यासाठी भटकंती; ११ गावात टँकरने पाणीपुरवठा.

पाणी टंचाईमुळे जनतेचे हाल
वाशिम: जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी ४७ लाख ९८ हजार रुपयांचा निधी खर्च केला जाणार असला तरी जिल्हय़ात आज घडीला जाणवत असलेल्या तीव्र पाणी टंचाईला जिल्हावासीयांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्हय़ात खेड्या पाड्यात, रानात जावून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना प्रशासनाच्यावतीने झालेल्या दिसून येत नाहीत. जिल्हय़ातील तहसीलदारांकडून प्राप्त माहितीनुसार ११ गावात टँकरने पाणी पुरवठा तर ४१ गावात विहीर अधिग्रहण केल्याची माहिती २९ एप्रिलला दिली. जिल्हय़ातील १0८ गावांमधील १0९ विहिरींचे खोलीकरण करण्याच्या कामास आराखड्यात समावेश करण्यात आला हो ता. तसेच जिल्हय़ातील २७९ गावांमधील २८४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या जाणार होत्या; मात्र २९ एप्रिलपर्यंत ४१ विहिरीच अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील १८, कारंजा तालुक्यातील ७, रिसोड तालु क्यातील १0, मालेगाव व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी ४ व वाशिम तालुक्यातील ८ विहिरींचा समावेश आहे. टंचाई काळा त पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरचाही आधार घेतला जाणार असल्याचे आराखडयात होते. ९३ गावांकरिता ९५ टँकर सुरू करण्यात येणार होते; मात्र प्रस्तावच न आल्याने केवळ जिल्हय़ात ११ टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मालेगाव येथे १0 टँकरचे प्रस्ताव सादर असून, अद्याप एकही सुरू करण्यात आला नाही. आराखड्यानुसार सर्वाधिक २५ टँकर मालेगाव तालुक्यात सुरू केले जाणार होते. मालेगाव तालुक्यात १0 गावातील टँकरचे प्रस्ताव तर मालेगाव शहरात ६ टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आल्यानंतरही तालुक्यात एकही टँकर सुरू करण्यात आला नाही. वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे एका गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. मंगरूळपीर तालुक्यात ५, कारंजा तालुक्यात १, रिसोड तालुक्यात १ , मानोरा तालुक्यात ३ टँकर सुरू करण्यात आले आहेत.