खड्डयांमुळे कुंभार जवळा ते लहान उमरा रस्त्याची अवस्था दयनीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:46 IST2021-08-25T04:46:24+5:302021-08-25T04:46:24+5:30
बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वाशिम तालुक्यातील पुसद मार्गावर कुंभार जवळा ते लहान उमरा या ...

खड्डयांमुळे कुंभार जवळा ते लहान उमरा रस्त्याची अवस्था दयनीय
बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, वाशिम तालुक्यातील पुसद मार्गावर कुंभार जवळा ते लहान उमरा या १० किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वारंवार अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला आहे. परंतु, या रस्त्याच्या दुरुस्तीची तसदी घेण्यात आली नाही. त्यामुळे कुंभार जवळा, लहान उमरासह सर्कलमधील अनेक गावच्या लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. निवेदन देताना मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी राजू किडसे, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, यांच्यासह अशोक नाईकवाडे, फकिरा कर्डिले, दिलीप कव्हर, विशाल गाडेकर, अंकुश गिरी, कन्हैय्या बाळापुरे, असलम चौधरी, जुम्मा बेनीवाले, दिलीप शेंडे, शाहरुख मांजरे, कालू मांजरे, सचिन भालेराव, बबलू राऊत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.