आरोग्य सेवक नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: November 16, 2014 23:54 IST2014-11-16T23:54:25+5:302014-11-16T23:54:25+5:30
अडोळी येथील प्रकार : रिपाइंचे निवेदन.

आरोग्य सेवक नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
वाशिम : येथून जवळच असलेल्या अडोळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तोंडगाव अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. अडोळी गावाची लोकसंख्या चार हजार असून येथे शासनाने आरोग्य उपकेंद्र बरेच वर्षापासून चालू आहे. परंतु या ठिकाणी गेल्या दीड वर्षापासून एका आरोग्य सेवकाची बदली झाल्यापासून आरोग्य सेवक नियुक्त केला नाही. म्हणून अडोळी येथील ग्रामवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अशा आशयाचे निवेदन रिपाइं कामगार आघाडीचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजकुमार पडघान यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. वाशिम यांना दिले आहे. गावात प्राथमिक उपचार मिळत नसल्याने या गावी गेल्या महिन्यात एका महिन्यात एका महिलेचा बळी गेला आहे. म्हणून अडोळी येथील आरोग्य लक्षा घेता या ठिकाणी आरोग्य अधिकार्याची नियुक्ती करावी आणि नेहमीसाठी आरोग्य सेवकाची नियुक्ती तात्काळ करावी, अशी मागणी पडघान यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.