इसमाचा विहिरीत पडून मृत्यू
By Admin | Updated: March 10, 2017 02:04 IST2017-03-10T02:04:16+5:302017-03-10T02:04:16+5:30
दफनविधीसाठी खड्डा खोदण्यासाठी गेलेल्या इसमाचा विहिरीत पडून मृत्यू.

इसमाचा विहिरीत पडून मृत्यू
उंबर्डाबाजार (जि. वाशिम), दि. ९- दफनविधीसाठी खड्डा खोदण्यासाठी गेलेल्या इसमाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ८ मार्च रोजी रात्री १0 वाजताच्या सुमारास मौजे सोमठाणा येथे घडली. याबाबत सविस्तर असे, की ग्राम सोमठाणा येथील राजाराम कोळकर नामक ६0 वर्षीय इसमाचे आजाराने अकोला येथे ८ मार्च रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम सोमठाणा येथेच होणार असल्याने सोमठाणा येथील बबन देवराव नाखले (वय ४५) हा इसम काही सहकार्यांसोबत दफनविधीचा खड्डा खोदण्यासाठी दिघी रस्त्यावरील राजारामच्या शेतात गेला होता. यातच बबनला तहान लागल्याने शेतालगत असलेल्या महादेव मंदिराच्या बारव विहिरीवर तो गेला असताना बबनचा तोल जाऊन विहीरीत पडल्याने मृत्यू झाला.