अपु-या नोंदीमुळे सावकारी कर्जमुक्ती वांध्यात!
By Admin | Updated: December 25, 2015 03:03 IST2015-12-25T03:03:18+5:302015-12-25T03:03:18+5:30
कारंजा तालुक्यात पडताळणीदरम्यान तलाठय़ांच्या अपूर्ण नोंदी निदर्शनात येत असल्याने पात्र शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची भीती.

अपु-या नोंदीमुळे सावकारी कर्जमुक्ती वांध्यात!
वाशिम: राज्य सरकारने सावकारी कर्जमुक्तीची घोषणा करून आठ महिने झाले आहेत. कारंजा तालुक्यात पडताळणीदरम्यान तलाठय़ांच्या अपूर्ण नोंदी निदर्शनात येत असल्याने पात्र शेतकरी सावकारी कर्जमुक्तीपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. सावकारांकडून शेतकर्यांनी कर्ज घेतले आहे. सदर कर्ज माफ होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शेतकर्यांकडून प्रस्ताव मागविले होते. सदर प्रस्तावासोबत परिपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक आहे; मात्र अनेक प्रस्तावांसोबत अपूर्ण माहिती असल्याने कर्जमुक्तीचा लाभ देणे कठीण ठरत आहे. कारंजा तालुक्यातील परवानधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदाराने सोने गहाण ठेवतेवेळी सावकारी रेकॉर्डमध्ये अपुर्या नोंदी झाल्या. त्यामुळे संबंधित गावाच्या तलाठय़ांकडून या प्रस्तांवाची पात्रता पडताळणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या. बहुतांश कर्जदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सावकारांकडून ३0 नोव्हेंबर २0१४ पर्यंंत कर्ज घेणार्या शेतकर्यांनी शेतकरी कुटुंबातील असल्याबाबत, त्यांचे कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने असलेल्या शेतजमिनीचे सातबारा उतारा व रेशनकार्डसंबंधी माहिती संबंधित गावच्या तलाठय़ांकडे २८ डिसेंबर २0१५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पात्रता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. काही शंका असल्यास तालुकास्तरावरील सहायक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, कारंजा तालुका सहायक निबंधक बी. जी. जाधव यांनी केले.