मातापित्यांच्या दुर्धर आजारामुळे कुशाग्र तन्मय हतबल!
By Admin | Updated: July 9, 2017 09:44 IST2017-07-09T09:44:59+5:302017-07-09T09:44:59+5:30
उच्च शिक्षणाच्या स्वप्नांना र्मयादा; समाजातील दानशूरांकडून मदतीची अपेक्षा.

मातापित्यांच्या दुर्धर आजारामुळे कुशाग्र तन्मय हतबल!
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड: शहरातील गरीब; परंतु कुशाग्र बुध्दिमत्तेचा तन्मय निनाद ढवळे हा विद्यार्थी आर्थिक दुष्टया फाटकं आयुष्य जगतो. दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण संपादन केल्यावर त्यांची खरी भटकं ती सुरू झाली. दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात दूर्धर आजाराने खाटेवर खिळलेले वडील आणि दृष्टी गमावलेली आई. यांच्या स्वप्नांना साकार करण्याच्या जिद्दीने तन्मय झपाटला आहे; परंतु अठरा विश्वे दारिद््रय़ आणि मातापित्यांचा दूर्धर आजार यामुळे तो हतबल झाला आहे. नियतीपुढे पदर पसरणारी आई विजया आणि दूर्धर आजाराने िपडित पिता निनाद ढवळे यांना त्यांच्या तन्मयच्या आयुष्याला आकार देण्यासाठी आधार हवा तन्मयच्या उर्जेला मदतीची फुंकर हवी.
तन्मय दहावीपयर्ंत कारंजा शहरातील जे.डी.चवरे विद्यामंदीर या शाळेत शिकला. शिक्षकांनी त्याला मदतीला हात दिला. आता आपल्या काळजात आयआयटीची व वैद्यकीय स्वनांची मनिषा घेऊन आपल्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला आपले भविष्य घडवायचे आहे. अशात संवगडयाच्या जिव्हाळयाच्या भांडवलावर अगोदर हैदाबादला व आता शाहुजी महाराज कनिष्ठ महाविदयालय लातूरला त्याला प्रवेश मिळाला; पण मित्र किती दिवस आधार देणार. त्यांना ही पणती जपून ठेवायची आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत जिल्ह्यातून तो पहिला आला. त्याचा लक्षवेधी शैक्षणिक प्रवास बघून सवंगडी प्रभावित झाले व त्याला वहया, पुस्तक नोट्स देउन अभ्यासाची सुविधा प्रसंगी भोजन व निवास व्यवस्था त्यांनी केली. तन्मयची अवस्था अशी की शिकवणी लावायची सोय नाही.
शिवाय अभ्यास करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही; पण जन्मजात बुध्दिमतेमुळे तन्मयने शाळेतील पहिला क्रमांक कधी सोडला नाही. जे.डी.चवरे शाळेत शिकतांना शिक्षकांचा, मित्रांचा, तसेच मामाचा व काकाचा हातभार लागला. आपल्या पुतण्याचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून त्यांनी विवाह केला नाही. आता त्याने लातूरच्या छत्रपती शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. तो बारावीतही चमकेलच पण दोन वर्ष कनिष्ठ महाविद्यालय व मग आपला आयुष्याला वळण देणारा वळण रस्ता येणार व लाखो रुपये लागतील, अशात गरीबीचा शाप असलेले हे हात अपुरे पडतील. त्यामुळे समाजातून मदतीचे हात पुढे यावे व तन्मयच्या उज्वल भविष्याला आधार व आकार मिळावा, अशी अपेक्षा त्याचे आजारी मातापिता करीत आहेत.