उड्डाणपुलाअभावी विकास खुंटला
By Admin | Updated: January 31, 2015 00:45 IST2015-01-31T00:45:04+5:302015-01-31T00:45:04+5:30
वाशिम जिल्हाधिकारी यांना निवेदन; प्रशासनाच्यावतीने ठोस पावले उचलण्याची गरज.

उड्डाणपुलाअभावी विकास खुंटला
वाशिम : स्थानिक पुसद रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटजवळ रेल्वे येण्याची वेळ झाल्यानंतर गेट बंददरम्यान मोठय़ा प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन वाहतूक विस्कळीत होत असून, येथे उड्डाणपुलाची अ त्यंत आवश्यकता आहे. या उड्डाणपुलासाठी सामाजिक संघटनांसह बर्याच जणांनी प्रयत्न केले; मात्र अद्यापही भिजत घोंगडे कायमच असून, प्रशासनाच्यावतीने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. या संदर्भात २६ जानेवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते दशरथ वाटाणे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन उड्डाणपूल तयार करावा व जिल्हय़ाच्या खुंटलेल्या विकासाला गती देण्याची मागणी केली आहे.