शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलनामुळे राज्यातील  ४३०० कोटींची विकास कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 15:44 IST

वाशिम : ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली.

ठळक मुद्दे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्याकरीता ४३०० कोटी रुपयांची विकास कामे मंजुर केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्र मध्ये नऊशे कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३४०० कोटी रुपयांची विकास कामे प्रलंबित आहेत.

वाशिम : शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करीत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले. सदर आंदोलन २० फेब्रुवारी रोजी सहाव्या दिवशीही सुरुच असल्याने ४३०० कोटींची विकास कामे ठप्प पडल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हा समन्वयक अनिल मधुकरराव फुलके यांनी दिली. राज्यभरात सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये ७५० कर्मचारी सहभागी आहेत.महाराष्ट्र शासनाकडून ग्रामीण रस्त्यांचा विकास करण्याकरीता ४३०० कोटी रुपयांची विकास कामे मंजुर केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्र मध्ये नऊशे कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित ३४०० कोटी रुपयांची विकास कामे प्रलंबित आहेत. सदर कंत्राटी कर्मचाºयांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यामध्ये पगारवाढ, प्रवास भत्ता, वैद्यकीय खर्च या बाबीवर साधारण ६ कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्च येणार आहे. तो खर्च ४३०० कोटी रुपयांच्या तुलनेत ०.००१३ टक्के राहणार आहे. अद्यापपर्यंत कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची ४३०० कोटी रुपयांची विकास कामे ठप्प पडली आहेत. शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे कंत्राटी कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळू शकला नाही , त्यामुळे न्याय मिळेपर्यंत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेत कर्मचाºयांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यालयासमोर ठिय्या देत आहेत. कंत्राटी कर्मचाºयांच्या आंदोलनाचा परिणामी कार्यालयीन कामकाजावर होत असल्याने सदर आंदोलन कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले आहे. जिल्हयात सुरु असलेल्या काम बंद आंदोलनामध्ये पुरुषोत्तम शामराव मुंधरे, अनिल मधुकर फुलके, प्रकाश सखाराम राठोड, अमोल अंबादास ठाकरे, जितेंद्र विठ्ठल कांबळे, सत्यम उत्तमराव मोकळे, निरज दशरथराव उकंडे, विजु चंपतराव नगराळे, ओंकार रामदास झुंगरे, संतोष विश्वनाथ सावरकर, गजानन किसनराव खाडे, संतोष जानकीराम चव्हाण, राजेश लालसिंग राठोड, सचिन रमेश देशमुख, चेतन उमेशराव वानखडे, प्रदिप नारायण कोगदे, निशिकांत नारायणराव टवलारे, नितिन सुधाकर फुरसुले, सागर शशिकांत कांबळे, सुनिल रामेश्वर पैठणे, श्रीकृष्ण हरीभाऊ गोरे, विनेश श्रीराम चव्हाण यांच्यासह अनेक कर्मचाºयांचा समावेश आहे.जोपर्यंत कंत्राटी कर्मचाºयांना न्याय मिळत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. जिल्हास्तरावर सुरु असलेल्या आंदोलनाबाबत राज्यस्तरिय समितीसोबत दररोज विचार विनीमय केल्या जात आहे.- अनिल मधुकरराव फुलके, वाशिम जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी संघटना 

टॅग्स :washimवाशिमChief Ministerमुख्यमंत्रीgovernment schemeसरकारी योजनाagitationआंदोलन