वाशिमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 05:24 PM2018-02-15T17:24:28+5:302018-02-15T17:27:24+5:30

वाशिम  :महाराष्ट्र  ग्रामीण रस्ते विकास संस्था जिल्हा वाशिमचे कंत्राटी  कर्मचारी गत ६ वर्षापासून न झालेली पगारवाढ तसेच इतर मुलभूत सुविधा न मिळाल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा कार्यालयासमोर सुरु केले आहे.

Work Stop movement for various demands of the contract workers of Washim | वाशिमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

वाशिमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

Next
ठळक मुद्देया संपामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामे ठप्प पडले असून यामध्ये जवळपास ७०० कर्मचारी सहभागी आहेत.   न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.  या संदर्भात शासनाने ताबडतोब पावले उचलण्याची मागणी केली आहे.

वाशिम  :महाराष्ट्र  ग्रामीण रस्ते विकास संस्था जिल्हा वाशिमचे कंत्राटी  कर्मचारी गत ६ वर्षापासून न झालेली पगारवाढ तसेच इतर मुलभूत सुविधा न मिळाल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जिल्हा कार्यालयासमोर सुरु केले आहे.  कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये  सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार समान काम समाने वेतन लागू करावे, २०१२ पासून न झालेल्या पगारातील फरकेची रक्कम त्वरित मिळावी, कायमस्वरुपी कर्मचाºयांप्रमाणे प्रवास भत्ता व इतर भत्ते लागू करावे, कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय रजा व महिला कर्मचाºयांकरिता प्रसृती रजा त्वरित लागू कराव्यात, अपघाती विमा लागू करावा, इएसआयसी सेवा लागू करावी, गटविमा व भविष्य निर्वाह निधी लागू करावा, आजपर्यंत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावरती कार्यरत असतांना अपघाती मृत्यू झालेल्या रुपेश दिघोरे, पाटील यांना वैद्यकीय खर्चाची रक्कम त्वरित मिळावी समावेश आहे.  कर्मचाºयांच्या या संपामुळे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामे ठप्प पडले असून यामध्ये जवळपास ७०० कर्मचारी सहभागी आहेत.  न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.  

सन २०१२ पासून क्रमप्राप्त असलेल्या वेतनवाढ, समान काम, समान वेतन, अपघात विमा, प्रवास भत्ता, वैद्यकीय रजा, प्रसृती रजा व इतर लाभांबाबत वारंवार मागनी करुनही न्याय न मिळत असल्यामुळे कर्मचाºयांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात शासनाने ताबडतोब पावले उचलण्याची मागणी केली आहे.

 काम बंद आंदोलनामध्ये  पुरुषोत्तम शामराव मुंधरे,  अनिल मधुकर फुलके, प्रकाश सखाराम राठोड, अमोल अंबादास ठाकरे, जितेंद्र विठ्ठल कांबळे, सत्यम उत्तमराव मोकळे, निरज दशरथराव उकंडे, विजु चंपतराव नगराळे, ओंकार रामदास झुंगरे, संतोष विश्वनाथ सावरकर, गजानन किसनराव खाडे, संतोष जानकीराम चव्हाण, राजेश लालसिंग राठोड, सचिन रमेश देशमुख, चेतन उमेशराव वानखडे, प्रदिप नारायण कोगदे, निशिकांत नारायणराव टवलारे, नितिन सुधाकर फुरसुले, सागर शशिकांत कांबळे, सुनिल रामेश्वर पैठणे, श्रीकृष्ण हरीभाऊ गोरे, विनेश श्रीराम चव्हाण यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Web Title: Work Stop movement for various demands of the contract workers of Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.