खराब रस्त्यामुळे जुमड्यात एसटीही जाईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:50 IST2021-09-09T04:50:12+5:302021-09-09T04:50:12+5:30
वाशिम तालुक्यातील तथा रिसोड रस्त्यावरील पाच मैल फाटा ते जुमडा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. या रस्त्यावर खंडाळा, अडोळी, ...

खराब रस्त्यामुळे जुमड्यात एसटीही जाईना
वाशिम तालुक्यातील तथा रिसोड रस्त्यावरील पाच मैल फाटा ते जुमडा रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे. या रस्त्यावर खंडाळा, अडोळी, जुमडा आदी गावे आहेत. खराब रस्त्यामुळे अनेक महिन्यांपासून परिवहन विभागाने या रस्त्यावर बस पाठविणे बंद केले. त्यामुळे गावकऱ्यांचा जिल्ह्याच्या ठिकाणचा संपर्क तुटला आहे. पाच मैल फाटा ते जुमडा डांबरी रस्ता हा ठिकठिकाणी उखडल्या गेला असून, या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. खंडाळा, अडोळी, जुमडा यासह नजीकच्या हिंगोली जिल्ह्यातील भगवती, तपोवन, कडोळी, गोरेगाव आदी गावांतून मोठ्या संख्येने बाजारहाट, तसेच इतर कामासाठी नागरिक याच रस्त्याने वाशिमला येतात. मात्र, सदर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त झाला नाही.
या रस्त्यावरून वाशिमला ये-जा करण्यासाठी परिसरातील अनेक गावे अवलंबून असल्यामुळे सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.