शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे; मच्छिमारांचा व्यवसाय बुडाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 15:17 IST

वाशिम : जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प कोरडे असून उर्वरित प्रकल्पांची पाणीपातळीही झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यव्यवसाय ठप्प पडला आहे. घटलेल्या पर्जन्यमानामुळे भोई समाजाचा मच्छिमारीचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला. पाणीपातळी झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यबीज मृत पावण्यासोबतच सद्य:स्थितीत व्यवसाय ठप्प पडला आहे. 

वाशिम : सन २०१३ ते २०१५ या तीन वर्षांत पावसाने दगा दिल्याने परंपरागत मत्स्यव्यवसाय करणारा भोई समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. २०१६ मध्ये परिस्थिती थोडी पुर्वपदावर आली; परंतू चालूवर्षी पुन्हा जिल्ह्यातील अधिकांश प्रकल्प कोरडे पडल्याने मत्स्यव्यवसाय धोक्यात सापडून या व्यवसायावर उपजिविका अवलंबून असणाऱ्या  भोई समाजातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.गतवर्षी घटलेल्या पर्जन्यमानामुळे भोई समाजाचा मच्छिमारीचा पारंपरीक व्यवसाय संकटात सापडला. त्याचे विपरित परिणाम यंदा दिसून येत आहेत. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १२२ लघूप्रकल्पांपैकी ७० टक्के प्रकल्प कोरडे असून उर्वरित प्रकल्पांची पाणीपातळीही झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यव्यवसाय ठप्प पडला आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाºया भोई समाजातील अधिकांश कुटूंब मच्छिमार असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. विशेष बाब म्हणजे गेल्या काही वर्षांत युवकवर्गही या व्यवसायाकडे वळले होते. मात्र, पाणीच नसल्याने त्यांना इतर रोजगार शोधावा लागत असल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यातील ठराविक धरणांमध्ये मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र, मात्र, पाणीपातळी झपाट्याने खालावल्यामुळे मत्स्यबीज मृत पावण्यासोबतच सद्य:स्थितीत व्यवसाय ठप्प पडला आहे. - राजू सहातोंडे, मत्स्यव्यावसायिक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमDamधरणfishermanमच्छीमार