कोरड्या दुष्काळाचे सावट
By Admin | Updated: July 7, 2014 23:44 IST2014-07-07T23:44:41+5:302014-07-07T23:44:41+5:30
धरणात अत्यल्प जलसाठा

कोरड्या दुष्काळाचे सावट
मालेगाव: जुन महिना संपून जुलै चा पहिला आठवडा संपत आला तरीही पावसाने अद्यापही आपली हजेरी न लावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. मागील वर्षी संततधार पावसामुळे खरिप हंगाम भुईसपाट झाला होता. त्यामुळे शेतकर्यांनी रब्बीच्या पिकात वाढ केली मात्र रब्बीचही पिके गेली निसर्गाच्या अवकृपेने शेतकर्यांच्या स्वप्नावरच पाणी फेरल्या गेले. यावर्षी पावसाच्या सरीच पाहायला न मिळाल्याने पावसाळा लागली नसल्याचे वातावरण तयार झाली आहे. शेतकरी जोरदार पाऊस कधी पडेल याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मृग नक्षत्र कोरडा गेल्याने आता आद्रा संपत आला असून पाऊस आता तरी पडेल काय? याची प्रतिक्षा शेतकरी करत आहे.
मालेगाव तालुक्यातील जुन २0१३ पासून मागील पावसाळयापासून पावसाची सरासरी पाहता ती कमीच होणारी आहे. जुन २0१३ महिन्यात ४४२.३0 टक्के पाऊस पडला. जुलै २0१३ ला २७0.२0 टक्के ऑगस्ट महिना २४८.२0 टक्के, सप्टेंबर महिन्यात १६३.८0 टक्के, ऑक्टोबर बहिन्यात ८0.0५, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, कोरडाच राहला. फेब्रुवारी २0१४ मध्ये ७.४0 टक्क्े, मार्च २0१४ मध्ये ५८ टक्के, एप्रिल महिन्यात ७ टक्के, मे कोरडा राहला जून १४ मध्ये ७९.0७ टक्के, पाऊस पडला. अद्यापही पेरणी योग्य पाऊस न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.तालुक्यातील धरणात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. तालुक्यातील जलसाठा शेती सिंचनामुळे कमी झाला असून व पाऊस ही दडी मारुन बसल्याने जलसाठयात अत्यल्प जलसाठा उरलेला आहे. तालुक्यात कुरळा धरणात 0.६७ दलघमी पाणी उरले असून केवळ २२.१९ टक्के साठा शिल्लक आहे. सुदी संग्राहक तलावात 0.६६ दलघमी पाणी उरले असून केवळ ४४.८९ टक्के साठा शिल्लक आहे. चोरद तलावात १.0४ दलघमी जलसाठा असून ४६ टक्के पाणी शिल्लक आहे. चाकातिर्थ मध्ये २.८९ दलघमी साठा असून ८.२0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. तर मालेगाव कोळी, कोल्ही, कळमेश्वर, सुकांडा, सोनखास, मसला, मुंगळा, डव्हा येथील बिलो ऐलीयशन वर आहेत तर रिधोरा, ब्राम्हणवाडा, कोल्ही हे कारेडा पडला आहेत. त्यामुळे आसपासचे नागरिक चिंताग्रस्त झाले आहे.