महिलांना ढोल-ताशांचे प्रशिक्षण

By Admin | Updated: September 29, 2014 02:17 IST2014-09-29T02:17:27+5:302014-09-29T02:17:27+5:30

वाशिम येथे नवरात्री उत्सवानिमीत्त एक अभिनव उपक्रम.

Drum-cards training for women | महिलांना ढोल-ताशांचे प्रशिक्षण

महिलांना ढोल-ताशांचे प्रशिक्षण

वाशिम : आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीही पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहे. माता भगिनींच्या अंगी असणार्‍या सुप्त गुणांचा विकास साधण्याच्या उद्देशाने वाशिम येथील वसुंधरा बहुद्देशीय संस्थेव्दारे घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर प्रथम वत्सगुल्म नगरीतील माता भगिनींसाठी नाशिक ढोल ताशा प्रशिक्षण शिबीराचे उदघाटन २७ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
सदर शिबीराचे उद्घाटन स्थानिक एस.एम.सी. इंग्लीश स्कुलच्या भव्य रंगमंचावर संध्याकाळी ६ वा झाले. यावेळी आयोजक सुरेश खरावन यांनी आपल्या प्रास्ताविकात महिलांच्या अंगी असणार्‍या सुप्त गुणांचा विकास करण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. व जास्तीत जास्त सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शिबीराचे उद्घाटक हरिभाउ क्षिरसागर यांनी केवळ अभ्यासाने संपूर्ण व्यक्तीमत्वाचा विकास होत नाही तर आपल्या अंगी असणारे छंद व आवड यांचाही विकास होणे गरजेचे असते आणि महिला वर्गासाठी ही एक उत्तम संधी आहे व यामुळे व्यायामही होतो. असे या उपक्रमाचे कौ तुक करुन यापुढेही अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाश्सन दिले. तसेच प्रमुख अतिथी शाम दुरतकर यांनी या शिबीरात सहभागी महिला प्रशिक्षणार्थींचे कौतुक करुन, महिला सबलीकरण साधणार्‍या प्रत्येक उपक्रमास यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहणार असल्याचे उपस्थित पाहुण्यांनी सांगितले.

Web Title: Drum-cards training for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.