कारंजा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष

By Admin | Updated: April 30, 2017 19:15 IST2017-04-30T19:15:15+5:302017-04-30T19:15:15+5:30

उंबर्डाबाजार (कारंजा) : अनियमित विज पुरवठ्याच्या फटका पाणी पुरवठा योजनेला बसत असल्याने उंबर्डाबाजार येथील इंदिरानगरातील झोपडपट्टीवासीयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.

Drought in water in Karanja taluka | कारंजा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष

कारंजा तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष

इंदिरानगरवासीयांची पाण्यासाठी पायपिट

उंबर्डाबाजार (कारंजा) : अनियमित विज पुरवठ्याच्या फटका पाणी पुरवठा योजनेला बसत असल्याने उंबर्डाबाजार येथील इंदिरानगरातील झोपडपट्टीवासीयांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.
उंबर्डाबाजार येथील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये तीन हातपंप आहे. तिनही हातपंप सद्यस्थितीत बंद असून, पाण्यासाठी एकही सार्वजनिक  विहीर नाही. आठ ते दहा दिवसानंतर इंदिरानगरमधील पाणीपुरवठ्याचा नंबर येतो. या दिवशी नागरिकांची पाण्याच्या टाकीजवळील, सार्वजनिक नळावर गर्दी होते. अनेकदा नंबरसाठी वादविवादसुध्दा होतात. ग्रामपंचायत प्रशासनाने इंदिरानगर झोपडपट्टी मधील नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती करण्याची मागणी इंदिरानगरवासीयांनी केली.

Web Title: Drought in water in Karanja taluka