पहिल्या दिवशी नामांकनाचा ‘दुष्काळ’
By Admin | Updated: September 20, 2014 22:20 IST2014-09-20T22:20:14+5:302014-09-20T22:20:14+5:30
वाशिम जिल्ह्यातील नामांकन प्रक्रीयेला प्रारंभ: दिवसभरात केवळ दोन नामांकन दाखल.

पहिल्या दिवशी नामांकनाचा ‘दुष्काळ’
वाशिम : आगामी विधानसभा निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याला २0 सप्टेंबरला प्रारंभ झाला. मात्र नामांकन दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील रिसोड मतदार संघाचा अपवाद वगळता अन्य कारंजा व वाशिम संघात एकाही उमेदवारांनी नामांकन दाखल केले नाही. अर्ज वि तरणात मात्र पहिल्याच दिवशी तीन्ही मतदारसंघात १0६ नामांकन अर्ज वितरीत करण्यात आले आहे त.
आगामी १५ ऑक्टोंबरला विधानसभेची निवडणूकीच्यादृष्टीने २0 सप्टेंबरला सकाळी ११ वाजेपासून जिल्हयातील वाशिम, रिसोड व कारंजा या तीनही मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज विक्रीला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी वाशिम मध्ये २३, रिसोडमध्ये ११ तर कारंजामध्ये सर्वाधिक ७२ उमेदवारी अर्जांचे वितरण झाले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.