पंढरपूर यात्रेच्या प्रवासी संख्येत घट
By Admin | Updated: July 7, 2014 23:56 IST2014-07-07T23:56:42+5:302014-07-07T23:56:42+5:30
पावसाअभावी विठोबांच्या यात्रेसाठी जाणार्या वारकर्यांची गर्दी मंदावली आहे.

पंढरपूर यात्रेच्या प्रवासी संख्येत घट
वाशिम : वाशिम आगारातून आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेसाठी जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली. पण पावसाअभावी विठोबांच्या यात्रेसाठी जाणार्या वारकर्यांची गर्दी मंदावली आहे. आतापर्यंंत १२ बसेस पंढरपूर यात्रेसाठी या आगारातून सोडण्यात आल्या. यावर्षी पावसाने दगा दिल्यामुळे शेतकर्यांच्या तथा यात्रेकरुच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आधी पोटाबा मग विठोबा असा विचार होत असल्याने यात्रेकरुंची गर्दी ५0 टक्के मंदावली आहे. जादा बसेसची व्यवस्था वाशिम आगाराचे वतीने यात्रा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेकरुंची योग्य व्यवस्था आगारातर्फे करण्यात आली आहे. यावर्षी ३ जुलै रोजी पहिल्या दिवशी दोन जादा बस फेर्या सोडण्यात आल्या. तसेच ४ जुलै रोजी एक बसफेरी, ५ जुलै रोजी ३ बसफेर्या, ६ जुलै रोजी ३ बसफेरी तथा ७ जुलै दुपार पर्यंत २ बसफेर्या सोडण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख एन.डी.चव्हाण यांनी दिली. तसेच मागील वेळी वाशिम ते पंढरपूर ४१0 रुपये तिकीटाचे दर होते. यावेळी ४४0 रुपये दर असल्याने प्रवाशी अन्य मार्गाने जात असल्याचे सांगण्यात आले. या जादा बसेस साठी तथा यात्रेकरुंच्या सोयीसाठी येथील आगार प्रमुख एन.डी.चव्हाण, सहाय्यक वाहतुक अधिकारी हिवाळे, तसेच दिलीप चव्हाण, चालक व वाहक व्यवस्था पाहात आहेत. मागील वर्षी वाशिम आगारातून एकूण ५२ जादा गाडया पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात आल्या होत्या. बसस्थानकावर यात्रेकरुंची प्रचंड गर्दी होती. पाऊस वेळेवर झाल्याने शेतीची कामे आटोपली होती. या जादा बसेस ने आगाराला ६ ते साडे सहा लाख रुपये उत्पन्न दिले होते. मात्र यावर्षी हा आगडा ३ लाखाचे जवळपास जाण्याची शक्यता अधिकार्यांनी व्यक्त केली. यासाठी व्यसनमुक्तीचे मुंढे यांनी यात्रेकरुंना सहकार्य केले.