वाहनचालकांची पाण्यातून वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST2021-08-01T04:37:43+5:302021-08-01T04:37:43+5:30

पोलिसांची संख्या अपुरी वाशिम : पोलीस स्टेशन शिरपूरअंतर्गत ३५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या ...

Drivers walk through water! | वाहनचालकांची पाण्यातून वाटचाल!

वाहनचालकांची पाण्यातून वाटचाल!

पोलिसांची संख्या अपुरी

वाशिम : पोलीस स्टेशन शिरपूरअंतर्गत ३५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत.

पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय

वाशिम : जिल्ह्यातील शिरपूरसह इतर अनेक गावांतील जुन्या पाणंद रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर चिखल झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अर्धवट मार्गावर अपघाताची भीती

वाशिम : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत वाशिम-कारंजादरम्यान एनएच १६१ ई या महामार्गाचे दस्तापूरनजीकचे काम अर्धवट आहे. वनविभागाच्या परवानगीअभावी हे काम थांबले.

वीजवाहिनीमुळे अपघाताचा धोका

वाशिम : कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे काही घरांवरून मुख्य वीजवाहिनी टाकण्यात आली आहे. वीजवाहिनी घराच्या छतापासून अवघ्या दोन फूट उंचीवर असल्याने धाेका आहे.

Web Title: Drivers walk through water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.