किरकोळ वादातून दाम्पत्याची आत्महत्या

By Admin | Updated: January 20, 2017 18:06 IST2017-01-20T18:06:30+5:302017-01-20T18:06:30+5:30

शाब्दिक वादामुळे राग अनावर झाल्याने मानोरातील एका दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली.

Doubtful suicide by a minor dispute | किरकोळ वादातून दाम्पत्याची आत्महत्या

किरकोळ वादातून दाम्पत्याची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि, 20 - शाब्दिक वादामुळे राग अनावर झाल्याने मानोरातील एका दाम्पत्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. साखरडोह येथील 19 जानेवारीची ही घटना आहे.  
 
हिम्मत पखाले आणि लता पखाले असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. 19 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी या दोघांमध्ये वाद झाला. या वादामुळे आलेला राग अनावर झाल्याने रागाच्या भरात दोघांनीही स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक रामकृष्ण मळघने यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.  दरम्यान,  या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

Web Title: Doubtful suicide by a minor dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.