शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘डबल मास्क’मुळे विक्रीत वाढ; सॅनिटायझरही खातेय भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 10:40 IST

Washim News : डबल मास्कचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे विक्रीतही वाढ झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  कोरोना विषाणू संसर्गापासून बचावात्मक पवित्रा म्हणून डॉक्टरांच्या आवाहनानुसार डबल मास्कचा वापर करण्याचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे विक्रीतही वाढ झाल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले. दरम्यान हात वारंवार धुण्याच्या सवयीमुळे सॅनिटायझरचीही मागणी वाढली आहे. दुसऱ्या लाटेत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून मास्कचा वापर, सॅनिटायझरने हात वारंवार धुणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे आदी उपाय वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सांगितले जात आहेत. डबल मास्क वापरा आणि कोरोना टाळा, असाही सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे गर्दीच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना डबल मास्क व सॅनिटायझरचा वापर वाढल्याने आपसूकच विक्रीतही वाढ होत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात कोेरोना चाचण्यांची दैनंदिन संख्या वाढविण्यात आली असून, दैनंदिन सरासरी ४५० रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रत्येक जण मास्कचा वापर करण्याला प्राधान्य देत असल्याने मास्कच्या मागणीत वाढ झाल्याचे औषधी विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधीचीदेखील मागणी वाढली आहे.

सॅनिटायझरची मागणी वाढलीकोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आणि सौम्य व मध्यम लक्षणे असणारे रुग्ण हे अधिक संख्येने गृहविलगीकरणात राहत असल्याने सॅनिटायझरचा वापर वाढल्याचे दिसून येते. गृहविलगीकरणातील रुग्णामुळे घरातील इतर सदस्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटायझरचा वारंवार मारा केला जात आहे. त्यामुळे साहजिकच पूर्वीच्या तुलनेत आता सॅनिटायझरची मागणी वाढली आहे.

अलीकडच्या काळात मास्क आणि सॅनिटायझरच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक जण डबल मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येते. याबरोबरच रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या औषधीलादेखील मागणी आहे.- हुकूम पाटील तुर्के , संचालक, मेडिकल स्टोअर्स, वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या