शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:49 IST2021-09-10T04:49:48+5:302021-09-10T04:49:48+5:30

संतोष वानखडे वाशिम : ना नोकरीची हमी, ना टीईटी वा सीईटीचे निश्चित वेळापत्रक यासह विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी डीएड (डीटीएड) ...

Don't want a teacher's job, Dad; Back to DED course! | शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ !

शिक्षकाची नोकरी नको रे बाबा; डीएड अभ्यासक्रमाकडे पाठ !

संतोष वानखडे

वाशिम : ना नोकरीची हमी, ना टीईटी वा सीईटीचे निश्चित वेळापत्रक यासह विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांनी डीएड (डीटीएड) अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील पाच डीएड कॉलेजमधील ३५० जागांसाठी यंदा केवळ ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. या अभ्यासक्रमाला आधी डीएड (डिप्लोमा इन एज्युकेशन), नंतर डीटीएड (डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन) आणि आता डीएलएड (डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन) या नावाने ओळखले जाते. दोन वर्षांच्या या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आधी नोकरीची हमखास हमी होती. यातूनच या क्षेत्रात जाणाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. आधी दहावीच्या आणि नंतर बारावीच्या निकालानंतर डीएडच्या अभ्यासक्रमाला निवड होण्यासाठी फेरी पद्धत वापरली जायची. त्या फेरीतून निवड झालेल्या अध्यापक विद्यालयांत प्रवेश निश्चित केला जात होता. मात्र, मागील काही वर्षांत नोकरभरतीवरील मर्यादा, खासगी शाळांमधील डोनेशन पद्धती, टीईटी, सीईटी यासह अन्य कारणांमुळे डीएडच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थी पाठ फिरवत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात पाच डीएड कॉलेज असून, यामध्ये ३५० जागा आहेत. मात्र, यंदा केवळ ८४ अर्ज आल्याने बहुतांश जागा रिक्तच राहण्याची दाट शक्यता आहे. एकिकाळी जीवघेणी स्पर्धा असलेल्या या अभ्यासक्रमासंदर्भात आता कुणीही या अन् प्रवेश घ्या, अशी स्थिती झाली आहे.

००००००००००

जिल्ह्यातील एकूण डीएड कॉलेज ५

एकूण जागा ३५०

अर्ज प्राप्त ८४

.............................

डीएड अभ्यासक्रमाकडे का फिरविली जातेय पाठ?

शिक्षक भरतीवरील मर्यादा

खासगी संस्थांच्या शाळांमधील डोनेशन पद्धती

सीईटी व टीईटीची वेळखाऊ प्रक्रिया

यापूर्वीची बेरोजगारांची फौज

नोकरीची हमी नसणे.

........................

म्हणून इतर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल..

कोट

डीएड अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची कोणतीही हमी नाही. अगोदरच डीएड झालेले अनेक उमेदवार बेरोजगार आहेत. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाला प्रवेश न घेता इंजिनिअरिंग क्षेत्राकडे वळलो आहे.

- तन्मय कपाले, विद्यार्थी

............

कधीकाळी डीएडनंतर शिक्षकाची हमखास नोकरी मिळायची. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरिता मोठी स्पर्धा होती. आता तशी परिस्थिती नाही. मी बीएस्सीला प्रवेश घेतला आहे.

- ओम आवटे, विद्यार्थी

Web Title: Don't want a teacher's job, Dad; Back to DED course!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.