बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवू नयेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:39 IST2021-02-13T04:39:20+5:302021-02-13T04:39:20+5:30
.............. जळलेल्या तुरीपोटी मदतीची प्रतीक्षा कारंजा : तोरणाळा घोटी येथील शेतकरी भीमराव राठोड यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला २५ ...

बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवू नयेत
..............
जळलेल्या तुरीपोटी मदतीची प्रतीक्षा
कारंजा : तोरणाळा घोटी येथील शेतकरी भीमराव राठोड यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला २५ डिसेंबर रोजी आग लागल्याने, १५ क्विंटल तूर जळून खाक झाली, तरी या प्रकरणी कोणतीच कार्यवाही प्रशासनाने केली नाही.
..............
नुकसान भरपाईची आगग्रस्ताची मागणी
कारंजा : कारंजा तालुक्यातील काजळेश्वर येथील महिला शेतकरी अंजनाबाई शंकरराव फरास यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला ११ जानेवारी रोजी दुपारी आग लागल्यामुळे गंजी जळून खाक झाली. यात महिला शेतकरी अंजनाबाई यांचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले, परंतु अद्याप मदत मिळाली नाही. मदतीची मागणी अंजनाबाई यांनी केली.
.............
ग्रामीण रुग्णालयात साेनाग्राफी मशीन बंद
मंगरुळपीर : येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असल्याने, गरोदरपणातील आवश्यक तपासणीसाठी रुग्णालयाशी संपर्क साधला जाताे, परंतु येथील सोनोग्राफी कक्ष तज्ज्ञांअभावी बंद राहत असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.