पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का रे भाऊ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:38 IST2021-08-01T04:38:43+5:302021-08-01T04:38:43+5:30
यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच ...

पावसाचा अन् नळाला येणाऱ्या पाण्याचा काही संबंध असतो का रे भाऊ ?
यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील १३७ प्रकल्पांपैकी ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. तर सर्व प्रकल्पांतील पातळीची सरासरी ५८ टक्के झाली आहे. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
--------------
एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के साठा, शहराची पाणीटंचाई नियंत्रित
१) वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.
२) प्रकल्पाची पातळी वाढल्यामुळे वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटली आहे.
३) शहराला दर तिसऱ्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे.
------------------
जिल्ह्यात झालेला पाऊस (मि.मी.)
तालुका - अपेक्षित - प्रत्यक्षात - टक्केवारी
वाशिम - ४६३.१ ५३१.५ -११४.८
मालेगाव - ४१७.९ ५५०.४ -१३१.७
रिसोड - ४०४.६ ५३३.५ -१३१.९
मंगरुळ - ३६५.९ ६३७.५ -१७४.२
मानोरा - ३७३.३ ५९३.६ -१५९.०
कारंजा - ४०६.६ ३९७.२ - ९७.७
------------------
धरणांतील साठा (दलघमी)
प्रकल्प - संख्या - उपयुक्त - टक्केवारी
मोठे - ०० - ०० - ००
मध्यम - ०३ - ४२.८३ - ६३.६९
लघु - १३४ - २०३.२४१ - ५६.१८
-----------------------------------
बॉक्स: शहरवासीय म्हणतात पाणीटंचाईपासून दिलासा
१) कोट :
यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. त्यात वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एक बुर्जी प्रकल्पात आता ९२ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे पूर्वी आठ दिवसांत होणारा पाणीपुरवठा आता तिसऱ्या दिवशी होत असल्याने पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे.
-सतीश सांगळे,
नागरिक, वाशिम
-----------
२) कोट :
वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के जलसाठा झाला आहे. या प्रकल्पातील साठा वाढल्याने पाणीटंचाईपासून मोठा दिलासा मिळाला आहे. दर तिसऱ्या दिवशी नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वी आठवड्यातून एकदाच नळाला पाणी यायचे.
-सागर हवालदार,
नागरिक, वाशिम
--------
बॉक्स: बळीराजा आनंदला
१) कोट:
जून महिन्याच्या अखेरपासून दडी मारणाऱ्या पावसाने जुलैच्या मध्यंतरापासून दमदार एन्ट्री केली. त्यामुळे बहुतांश प्रकल्पाची पातळी वाढली. आता यंदा रब्बी हंगामात सिंचनासाठी आम्हांला पाणी मिळू शकेल, असा विश्वास आहे.
- नितीन पाटील उपाध्ये,
शेतकरी , काजळेश्वर,
----------
२) कोट:
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली होती. प्रकल्पांच्या पातळीत किचिंतही वाढ न झाल्यामुळे सिंचनासाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका वाटत होती; परंतु जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यानंतरच पावसाने दमदार हजेरी लावणे सुरू केल्याने प्रकल्पांची पातळी वाढली.
-नंदकिशोर तोतला,
शेतकरी, इंझोरी