डॉक्टरांचा मरनोपरांत नेत्रदानाचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:06+5:302021-08-27T04:44:06+5:30
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, डॉ. यादव यांच्यासह डॉ. मडावी, डॉ. ...

डॉक्टरांचा मरनोपरांत नेत्रदानाचा संकल्प
वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालय वाशिम येथील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, डॉ. यादव यांच्यासह डॉ. मडावी, डॉ. गटोर, डॉ. हेडाव, डॉ. उदगिरे, डॉ. बेदरकर यांनी मरनोपरांत नेत्रदान संमतिपत्र भरून नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्यास प्रारंभ झाला असून या पंधरवड्यात डॉक्टरांनी मरनोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला.
२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २००१ दरम्यान राष्ट्रीय अंधत्व पंधरवडा नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ३६ वा नेत्रदान पंधरवडा साजरा होत असून २७ ऑगस्टपासून प्रारंभ झालेल्या या पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाबाबत जनजागृतीच्या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर गठोड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित रुग्ण व नातेवाइकांना तसेच कर्मचाऱ्यांना नेत्रदान पंधरवड्यानिमित्त नेत्रदानाविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नेत्र शल्यचिकित्सक तथा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (अंनिका) डॉ. चांडोळकर, डॉ. बेदरकर, चिकित्सा अधिकारी ज्ञानेश्वर पोटफोडे, सुधीर साळवे, रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती हजारे, नेत्रदान समुपदेशक रमेश ठाकरे, लेखापाल ओम राऊत व इतर कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
वाशिम येथे नुकतेच अपंग नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून त्यामध्ये ४२ नेत्ररुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. सदर शिबिरात नेत्रदान महादान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.