अपघातात जानेफळ येथील डॉक्टर ठार

By Admin | Updated: September 22, 2014 01:43 IST2014-09-22T01:41:23+5:302014-09-22T01:43:10+5:30

अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा अपघाती मृत्यू.

The doctor at Jaiphel was killed in an accident | अपघातात जानेफळ येथील डॉक्टर ठार

अपघातात जानेफळ येथील डॉक्टर ठार

कनेरगाव नाका (वाशिम ) : येथे वैद्यकीय व्यवसाय करणारे व मुळचे जानेफळ येथील रहीवासी असलेले डॉ.गोवींद लालचंद राठी हे २0 सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात ठार झाले आहेत.
या संदर्भात अधिक माहिती नुसार मुळचे बुलडाणा जिल्हयातील जानेफळ येथील रहीवासी असलेले २५ वर्षीय डॉ.गोविंद लालचंद राठी हे २0 सप्टेंबर रोजी रात्री १0 ते १0.३0 च्या दरम्यान दुचाकीने कनेरगाववरुन वाशिमकडे येत होते. तामसाळा पाटीजवळ डॉक्टर राठी आले असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती कळताच कनेरगाव येथील अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दि.२१ सप्टेंबर रोजी त्यांच्यामुळ गावी जानेफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आजी, आई, एक भाउ, दोन बहिणी, असा परिवार आहे. युवा वैद्यकाच्या अपघाती मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: The doctor at Jaiphel was killed in an accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.