कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:13+5:302021-07-30T04:43:13+5:30
वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत ...

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का?
वाशिम : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे. जाचक अटी असल्याचे कारण समोर करून बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते. गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याने कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का? असा संतप्त सवालही शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
०००००००००००००
जिल्ह्यातील एकूण शेतकरी २७७२४२
पीकविमा काढलेले शेतकरी
गतवर्षी २७२५९७
यावर्षी १४२६९७
००००००००००००
एकूण खरीप क्षेत्र ४०६२३४
सोयाबीन ३००४१७
कपाशी १९२४५
तूर ५४५०९
मूग ९१०२
उडीद १०१७९
ज्वारी ८२७२
००००००००००००००
यंदा केवळ ५१ टक्के पीकविमा
१) गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीची भरपाई मिळाली नाही.
२) जाचक अटी व दिरंगाई यामुळे यंदा शेतकऱ्यांना पीकविमा योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
३) यंदा २७७२४२ पैकी १४२६९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला असून, याची टक्केवारी ५१ अशी येते.
०००००००
गतवर्षीचा अनुभव वाईट
गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचा विमा उतरविण्यात आला होता. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने ४८ तासांच्या आत संबंधितांना माहिती देण्यात आली होती. सर्वेक्षणही झाले. परंतु, नुकसानभरपाई मिळाली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा? असा प्रश्न आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.
- गौतम भगत, शेतकरी
०००००
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगराईमुळे नुकसान झाल्यास पिकांना संरक्षण म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पीकविमा उतरविण्यात येतो. गेल्यावर्षी विमा उतरविण्यात आला होता. पंचनामेही करण्यात आले होते; परंतु नुकसानभरपाई मिळालेली नाही. याबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावाही केला होता. नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
- टी. एम. सरकटे, शेतकरी
००००००००००००
नुकसानभरपाई मिळावी याकरिता प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत पिकांना संरक्षण देण्यात येते. पीकविमा योजनेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. गेल्यावर्षी खरीप हंगामात २७२५९७ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. यंदा जिल्ह्यातील १ लाख ४२ हजारांवर शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.
- शंकर तोटावार,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.