‘संडास बांधा ना धनी, आपल्या घरी..!’
By Admin | Updated: September 15, 2016 02:55 IST2016-09-15T02:55:42+5:302016-09-15T02:55:42+5:30
हगणदरीमुक्त गावासाठी वाशिम जिल्ह्यात संवाद पर्व कार्यक्रम सुरु.

‘संडास बांधा ना धनी, आपल्या घरी..!’
वाशिम, दि. १४ : गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात ह्यसंवाद पर्वह्ण उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असून, १३ सप्टेंबर रोजी तालुक्यातील वांगी येथे रामचंद्र बहूद्देशीय संस्थेचे शाहीर मधुकर गायकवाड व सुशीलाबाई घुगे यांनी कलापथकाच्या माध्यमातून ह्यसंडास बांधा ना धनी, आपल्या घरी..ह्ण! या गीताच्या माध्यमातून उपस्थितांना शौचालय उभारणीचे आवाहन केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नगर परिषद प्रशासन अधिकारी दीपक मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप देशमुख, सरपंच सविता भोयर, जिल्हा माहिती कार्यालयाचे तानाजी घोलप, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे राजू सरतापे, राम श्रृंगारे, पोलीस पाटील माधव भोयर, अर्जुन उदगिरे आदी उपस्थित होते. वैयक्तिक व सार्वजनिक लाभासाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांचा प्रत्येकाने लाभ घेऊन गावाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन हर्षदा देशमुख यांनी केले. याप्रसंगी शाहीर मधुकर गायकवाड व सुशीलाबाई घुगे, राजरत्न अंभोरे, सुभाष पडघान व रुखमाबाई सावंत यांनी कलापथकाच्या माध्यमातून शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. मुलीला जन्म घेऊ द्या, तिला उच्च शिक्षित बनवा, असे आवाहन करीत गीताद्वारे व्यसनमुक्त बना, लग्नावर लाखो रुपये खर्च न करता साधे लग्न किंवा सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचे आवाहन केले.