शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुपनलिका ५०० फूटांपर्यंत खोदूनही पाणी लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 14:43 IST

पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सर्वदूर यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३१ लघू आणि ३ मध्यम अशा एकूण १३४ प्रकल्पांमध्ये सद्या केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यासोबतच कुपनलिका, हातपंप, विहिरी आदी जलस्त्रोतही आटले आहेत. जमिनीखालची पाणीपातळी देखील दीड मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने प्रत्यक्षात असलेली २०० फुटाची मर्यादा ओलांडून ५०० फुटापर्यंत कुपनलिका खोदूनही पाणी लागत नसल्याचे प्रकार काहीठिकाणी घडत आहेत.जिल्ह्यात दरवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यात सातत्य नाही. वाशिम जिल्ह्याचे भूगर्भीय क्षेत्र मुख्यत: ‘दख्खन बस्तर लाव्हा’ या प्रकारच्या खडकाचे आहे. पूर्णपणे ‘बेसॉल्ट’ने आच्छादित या जिल्ह्यात काही ठिकाणी विघटित, तर काही ठिकाणी ‘व्हेसिक्युकर झिओलिटिक प्रस्तर’ची झीज झाली आहे. यामुळे पडलेल्या भेगांमुळे सच्छिद्रता निर्माण होऊन भूजल साठा वाढण्यास मदत मिळते; परंतु पावसाची प्रत्यक्ष सरासरी ही कागदावर मोठी दिसत असली तरी, गेल्या काही वर्षांत जमिनीत मुरणारा पाऊस झालेला नाही. त्यामुळे जमिनीखालच्या पाणीपातळीवर प्रचंड परिणाम झाला असून उन्हाळ्यात त्याची गंभीरता दिसून येत आहे.सद्य:स्थितीत जमिनीखालची पाणीपातळी दीड मीटरपेक्षाही अधिक खोलवर गेल्याने मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात कुपनलिका खोदूनही पाणी लागणे कठीण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे पैसे व्यर्थ खर्च होण्यासोबतच कुपनलिका खोदताना भूजल अधिनियमाची सर्रास पायमल्ली सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.वाशिम जिल्ह्यात सद्या भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी देखील आपली नैतिक जबाबदारी समजून याकामी प्रशासनाला सहकार्य करण्यासोबतच नियमबाह्य पद्धतीने कुपनलिकांचे खोदकाम करू नये.- ऋषीकेश मोडकजिल्हाधिकारी, वाशिम

नियमबाह्य पद्धतीने अधिक खोलवर कुपनलिका घेणे, ठराविक अंतराची मर्यादा न पाळता मन मानेल त्या अंतरावर कुपनलिकांसाठी खोदकाम करण्याच्या प्रकारामुळे जमिनीखालची पाणीपातळी दिवसागणिक खोलवर चालली आहे. मात्र, या गंभीर प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी सद्यातरी प्रशासकीय पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह अन्य ठोस व्यवस्था नाही.- एस.एस. कडू, वरिष्ठ भुजल वैज्ञानिक

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईdroughtदुष्काळ