लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रभु श्रीराम यांच्या जन्मस्थळी अर्थात अयोध्या येथे भव्य मंदिर उभारण्यासाठीचा लढा निरंतर सुरु ठेवण्यासाठी साध्वी ऋतंभरा यांच्या उपस्थितीत लाखाळा परिसरातील निरंकारी भवनच्या बाजूला खुल्या मैदानात १३ फेब्रुवारी रोजी विराट हिंदू सभेचे आयोजन करण्यात आले. तत्पुर्वी शहरातून भव्यदिव्य स्वरूपात तथा वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.अयोध्या येथे प्रभु श्रीरामाचे मंदिर निर्माणचा संकल्प व गोहत्या बंदी प्रचारार्थ निघालेल्या साध्वी ऋतंभरा देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत विराट हिंदू सभा आयोजित करण्यात आली असून कार्यक्रमापुर्वी वाशिम शहरातील मुख्य मार्गावरून डी.जे. आणि ढोलताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. त्यात हिंदुप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
ढोलताशांच्या निनादाने वाशिम दुमदुमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 15:00 IST