दिव्यांग मंगेशचे गावासाठी कायपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST2021-03-22T04:37:22+5:302021-03-22T04:37:22+5:30
दिव्यांग मंगेशचे गावासाठी कायपण नंदकिशाेर नारे वाशिम : जीवनात काही करण्याची जिद्द असली की मनुष्य काहीपण करण्यास धजावताे. ...

दिव्यांग मंगेशचे गावासाठी कायपण
दिव्यांग मंगेशचे गावासाठी कायपण
नंदकिशाेर नारे
वाशिम : जीवनात काही करण्याची जिद्द असली की मनुष्य काहीपण करण्यास धजावताे. असाच काहीसा प्रकार भूमिहीन असलेल्या व मजुरीवर आपले कुटुंब चालविणाऱ्या दिव्यांग मंगेशने सुध्दा एक हात नसतांना गावात लाेकसहभागातून हाेत असलेल्या कामात हातभार लाऊन गावासाठी कायपणची प्रचिती दाखविली.
मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तपाेवन हे गाव पाणी फाउंडेशनमध्ये असल्याने तसेच नुकतेच गावात समाज मंदिराचे काम लाेकसहभागातून करण्यात येत आहे. यामध्ये येथीलच ३२ वर्षीय दिव्यांग तरुण मंगेश अशाेक सावळे याला एक हात नसतांना सुध्दा कुदळीने खड्डा खाेदताना दिसून येत असल्याने अनेक धडधाकट व्यक्तिंना लाजवेल असे कार्य करीत आहे. मंगेशकडे काेणत्याच प्रकारची शेतजमीन नसल्याने ताे माेलमजुरी करुन आपल्या कुटुंबातील पत्नी, ५ व ७ वर्षीय मुलगा, मुलगी यांचे कुटुंब चालविताे. ६ वर्षापूर्वी ट्रॅक्टरवरील थ्रेशर मशीनमध्ये हात गेला तरी सुध्दा हार न मानता संघर्ष करीत आपला व आपल्या कुटुंबाचा भार उचलताेय. गावातील काेणत्याही कार्यात मंगेश हिरीरीने भाग घेत असल्याचे तपाेवनचे सरपंच शरद पाटील येवले यांनी सांगितले. गावात सुरु असलेल्या समाज मंदिराचे काम चालू असताना एका हाताने टिकाव चालवता येत नसल्याने खचून न जाता जिद्दीने एका हाताने सब्बल घेऊन लाेकसहभागात सहभागी झाला. त्याला पाहून अनेक जण मंगेशचे काैतुक केल्याशिवाय राहत नाही.
........................................
मंगेशचा व्हिडिओ व्हायरल; अनेकांकडून काैतुक
साेशल मीडियावर मंगेशचा एका हाताने सब्बलव्दारे खड्डे खाेदण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक जण त्याला लाईक व शेअर करुन कार्याचा गैारव करीत आहेत.
..............................