शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये गुरुवारी पीडित बालकांसाठी विभागीय तक्रार निवारण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 17:47 IST

वाशिम : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ आॅगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ आॅगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. त्यात विभागातील पाचही जिल्हे सहभागी होणार असून त्यानुषंगाने राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची चमू वाशिममध्ये दाखल झाली आहे.राष्ट्रीय बाल हक्क आयोगामार्फत देशात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून बालकांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. दरम्यान, नीती आयोगाने निवडलेल्या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश असल्याने राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने यंदा वाशिम येथे तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. रस्त्यावर वास्तव्य करणारी मुले, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्था, बालगृह, वसतिगृह किंवा इतर ठिकाणी शिक्षण, प्रशिक्षण घेत असलेली किंवा निवासी स्वरूपात राहत असलेली प्रत्येक घटकातील बालके आयोगासमोर स्वत: तक्रार दाखल करू शकतात किंवा बालकांच्यावतीने इतर कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करू शकते.मुलांचे शोषण, त्यांची खरेदी-विक्री, अपहरण, शिक्षण याविषयीच्या तक्रारी, बाल न्याय अधिनियम, बालकांच्या संबधित कायदा, बालविवाह कायदा, माहिती तंत्रज्ञान कायदा आदींचे उल्लंघन यासह बालकांवर होणाºया अन्याय, अत्याचारविषयक तक्रारी, बालकांचे आरोग्य, काळजी, कल्याण आणि विकास याविषयीच्या तक्रारी या शिबिरामध्ये दाखल करता येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिम