विभागीय आयुक्त उद्या वाशिममध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 18:55 IST2017-10-11T18:53:52+5:302017-10-11T18:55:01+5:30
वाशिम: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह हे गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त उद्या वाशिममध्ये!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३ आॅक्टोबर ते ५ जानेवारी २०१८ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या महिमेचा आढावा घेण्यासाठी अमरावती विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक पियुष सिंह हे गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी वाशिम येथे येणार असून त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमानुसार दावे व हरकती ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत स्विकारल्या जाणार आहेत. याच कालावधीत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांचे नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत ५ डिसेंबरपर्यंत आहे. डाटाबेसचे अद्ययावतीकरण २० डिसेंबर पर्यंत केले जाईल आणि ५ जानेवारी २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.