वाशिम जिल्हा विभागात अव्वल, राज्यात पाचवा

By Admin | Updated: March 28, 2015 01:56 IST2015-03-28T01:56:43+5:302015-03-28T01:56:43+5:30

स्वच्छ भारत मिशन; एका वर्षात १५ हजाराच्यावर शौचालयांचे बांधकाम.

In the district of Washim, the fifth in the state | वाशिम जिल्हा विभागात अव्वल, राज्यात पाचवा

वाशिम जिल्हा विभागात अव्वल, राज्यात पाचवा

वाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चालु आर्थिक वर्षाचे १५३७६ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट जिल्हा व तालुक्याच्या चमूने पूर्ण केले असून, या वर्षात १५५६२ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे. मु ख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी मागील चार महिन्यांपासून याबाबत सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे चालु आर्थिक वर्ष संपण्याआधीच शौचालय बांधकामाचे वार्षिक उद्दिष्ट जिल्ह्याने प्रथमच पूर्ण केले आहे. यामुळे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा विभागात अव्वल आणि राज्यात पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जिल्हय़ातील तालुकानिहाय उद्दिष्ट व साध्य किती झाले तर यामध्ये वाशिम तालुक्यामध्ये २७४३ शौचालयाचे उद्दिष्ट होते, त्यापैकी २३0६ साध्य झाले. मालेगाव तालुक्यात २६८३ उद्दिष्टांपैकी २५२0, रिसोड तालुक्यात २0५५ उद्दिष्टांपैकी २७९0 , मंगरूळपीर तालुक्यात २३८0 उद्दिष्टांपैकी २५२२, मानोरा तालुक्यात ३0१२ उद्दिष्टांपैकी २८७१ तर कारंजा तालुक्यात २५0३ उद्दिष्ट होते, २५५३ साध्य झाले. जिल्हय़ातील १५३७६ उद्दिष्टांपैकी १५५६२ म्हणजे उद्दिष्टांपैकी जास्त झाले. याकरिता १0 कोटी ५0 लाख रूपये वाटप करण्यात आलेत. त्यामध्ये वाशिम तालुक्याला १ कोटी ५0 लाख, मालेगाव तालु क्याला ९0 लाख, रिसोड तालुक्याला २ कोटी, मंगरूळपीर तालुक्याला २ कोटी ५0 लाख, मानोरा तालुक्याला २ कोटी, कारंजा तालुक्याला २ कोटी १0 लाख रूपयांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा परिषदेची सूत्ने हाती घेतल्यापासूनच शौचालय बांधकाम आणि अनुदान वाटपावर भर दिला होता. वारंवार तालुकानिहाय बैठका घेऊन या कामात आघाडी घेणार्‍यांना प्रोत्साहन आणि कामात कुचराई करणार्‍यांवर त्यांनी कठोर कारवाई केली होती. उ पमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गट विकास अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच, ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकांनी युद्धपातळीवर यासाठी प्रयत्न केले होते. यामुळे उद्दिष्टांपेक्षाही जास्त काम या विभागाने केले आहे. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे, क्षमता बांधणी तज्ज्ञ प्रफुल्ल काळे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर आंबेकर जनसंपर्क अधिकारी राम श्रुंगारे, वित्त व संपादणूक सल्लागार सुमेर चाणेकर, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार पुष्पलता अफुणे, रवि पडघान, पाणी गुणवत्ता निरीक्षक विवेक राजुरकर यांच्यासह अनेकांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title: In the district of Washim, the fifth in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.