महाकरिअर पोर्टल नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात आठव्या स्थानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST2021-06-04T04:31:41+5:302021-06-04T04:31:41+5:30

इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एका क्लिकमध्ये एकाच ठिकाणी करिअर संदर्भाने महाकरिअर पोर्टलमध्ये माहिती मिळते आहे. महाराष्ट्र शासन, युनिसेफ ...

The district ranks eighth in the state in Mahacareer portal registration | महाकरिअर पोर्टल नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात आठव्या स्थानावर

महाकरिअर पोर्टल नोंदणीमध्ये जिल्हा राज्यात आठव्या स्थानावर

इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एका क्लिकमध्ये एकाच ठिकाणी करिअर संदर्भाने महाकरिअर पोर्टलमध्ये माहिती मिळते आहे. महाराष्ट्र शासन, युनिसेफ व आसमा फाऊंडेशनचा हा कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, मास्टर ट्रेनर, शाळेतील इतर कर्मचारीवृंद, वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सर्व पदाधिकारी, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, मोबाईल शिक्षक, तालुका समन्वयक, केंद्रप्रमुख, विषय सहाय्यक, जिल्हा समुपदेशक, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, जिल्हा समन्वयक, राज्य समन्वयक, अधिव्याख्याता तथा तालुका संपर्क अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, वरिष्ठ अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम या सर्वांच्या सांघिक कार्यातून ही आघाडी अलीकडच्या पंधरवड्यात वाशिम जिल्ह्याने घेतली आहे. ‘स्वयंप्रेरणेने पुढाकार' या तत्त्वाचा सुयोग्य परिचय देत वाशिम जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद नरवाडे, कारंजा तालुका सचिव विजय भड यांनी या संपूर्ण प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल वरिष्ठांनी त्यांचेही कौतुक केले आहे. वाशिम जिल्ह्याच्या या कामगिरीबद्दल राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचालक दिनकर टेमकर, व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाचे प्रमुख दीपक माळी, राज्य समन्वयक श्याम राऊत या सर्वांनी वाशिम जिल्ह्याच्या टीमचे विविध माध्यमातून कौतुक केले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वाशिमचे प्राचार्य ज्ञानेश्वर नागरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक अंबादास मानकर, जिल्हा समन्वयक शिवशंकर मोरे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवून वाशिम जिल्ह्याला पहिल्या पाचमध्ये आणण्याचा मानस व्यक्त केला आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था समुपदेशक राजेश सुर्वे यांनी दिली.

Web Title: The district ranks eighth in the state in Mahacareer portal registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.